प्रेरणा सुतार अव्वल

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

रायगड जिल्हा परिषद व अक्षरशिल्प हँडरायटिंग अँकँडमी महाड संचलित हस्ताक्षर सुधार प्रकल्प 2023-24 हा उपक्रम रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यातील 82 प्राथमिक शाळेत राबविण्यात आला. यामध्ये 4,545 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.

माणगाव तालुक्यातील प्राथमिक शाळा विळे येथील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. या अ‍ॅकॅडमीच्यावतीने विळे समन्वयक म्हणून प्रेरणा सोपान सुतार हिची निवड करण्यात आली होती. प्रेरणा सुतार हिने या विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करून सराव घेतला त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात कमालीची सुधारणा झाली. तिच्या या कार्याची दखल घेऊन अक्षरशिल्प हँडरायटिंग अँकँडमी महाड यांच्यातर्फे माणगाव तालुक्यातील उत्कृष्ट समन्वयक म्हणून प्रेरणा सुतार हिने प्रथम क्रमांक पटकावला.

त्यामुळे तिला अक्षरशिल्प हॅन्डरायटिंग अ‍ॅकॅडमीचे संस्थापक नरेंद्रजी महाडिक, प्रियांका महाडिक, चंदन तोडणकर आणि अक्षरशिल्प परिवार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version