सिंधुदुर्गा मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

। सिंधुदुर्ग । वार्ताहर ।
सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने लोकांची दैना उडाली. पावसामुळे फोटोत अंधार पडल्याचं पाहायला मिळत आहे. जोराचा वारा असल्याने नारळाची झाडं डुलत आहे.
झालेल्या पावसामुळे परिसरात चिकल दिसत आहे. नारळाच्या झाडांबरोबर इतर झाडं सुध्दा वाऱ्यांच्या देशाने डुलत आहेत. रस्त्यात पाणी सुध्दा अनेक ठिकाणी साचलं होतं. त्याचबरोबर पडलेल्या पावसामुळे रस्त्यात अनेकज मोटारसायकवरून पडले सुध्दा आहेत.वादळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात सावंतवाडी,दोडामार्ग, कुडाळ, कणकवली व वैभववाडी तालुक्यात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला.सोबत जोराचा वारा व गडगडाटही होताच.या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले आहे.अनेक ठिकाणी झाडे व विजेचे पोल कोसळूनपडले.

Exit mobile version