। रसायनी । वार्ताहर ।
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जतन करण्यासाठी एक पाऊल पुढे ही संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न दोन्ही समाज करीत आहेत, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांनी केले.
हिंदू-मुस्लिम बांधव यांचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी रायगड पोलीस अंतर्गत खालापूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातुन व ग्रुपग्रामपंचायत तुपगाव, ग्रामस्थांच्या सहकार्याने यासीन भालदार, शरीफ भालदार, बंधू व मुस्लिम बांधव यांनी तुपगाव येथील हनुमान मंदिराजवळ शामियाना उभारुन गणपती बाप्पावर फुलांचा वर्षाव केला. तसेच सर्व गणेशभक्तांसाठी बुंदीच्या लाडूचे प्रसाद म्हणून वाटप केले.
वसंत कुंभार यांनी यासीन भालदार हे त्यांच्या वडिलांचे समाजसेवेचे व्रत पुढे नेत असून वडिलांनी जपलेली सामाजिक बांधिलकी, दानशूरपणा व हिंदू-मुस्लिम बांधव यांचे एकोपा दर्शन हे आमच्या परिसरासाठी भूषण असल्याचे सांगितले. यावेळी सपोनि युवराज सुर्यवंशी, रुपेश दळवी, सुरेश गुरव, योगेश गुरव यांच्यासह मुस्लीम बांधव, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.