संस्कृतीबरोबर ‌‘संस्कृत’ भाषा टिकवा: सुहास मराठे

| खरोशी | प्रतिनिधी |

परदेशात संस्कृत भाषेला किती महत्त्व आहे तसेच, परदेशीयन संस्कृत शिकून आपल्याकडे शिकवायला आल्यावर फॉरेन रिटर्न म्हणून आपण महत्व देतो व त्यांचे कौतुक करतो. पण जे खरतर आपल आहे. हे आपण समजुन घेऊन शिकल पाहिजे. त्याची सुरूवात स्वाती चक्रदेव यांनी छानच केली त्याचा विस्तार झाला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करून आपल्या संस्कृती बरोबर संस्कृत भाषा टिकली पाहिजे, तिचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन सुहास मराठे यांनी केले.

देववाणी, संस्कृत भाषा हिचे संवर्धन करण्यासाठी व घराघरात ती पोहचून व्यवहारात यावी या उद्देशाने संस्कृत भारती या संस्था देशात व परदेशात असे वर्ग घेण्याच काम खुप वर्ष करत असून पेणमध्ये तीन वर्षांपासून वर्ग सुरू असून पुर्णपणे मोफत 25 एप्रिल ते 4 मे या 10 दिवसाच्या कालावधीत रोज संध्याकाळी 6 ते 8 या दोन तासात शिक्षक सामाजिक सेवा समजून काम करत होते. संभाषण शिक्षणाद्वारे संस्कृत विषयाची ओळख वही, पेन, पुरस्काराशिवाय शिक्षक छान करुन देत. संस्कृत विषयाचे पूर्व ज्ञान नसले तरी त्याची आवड संभाषण शिक्षणाद्वारे निर्माण होते. पेणमधील वर्गात एकुण 15 ते 16 विद्यार्थी नियमित हा मोफत वर्गात हजर होते. स्वाती चक्रदेव यांनी मुख्यशिक्षिका म्हणुन काम बघितले. त्यांना प्रज्ञा साळुंखे, सुप्रीया मराठे, तनुजा आकुत यांनी मदत केली. समारोप प्रसंगी सुहास मराठे अध्यक्ष म्हणुन लाभले. सुत्रसंचालनाचे काम नेहा निमण यांनी संस्कृतमधुन केले. विषेश म्हणजे या वर्गात त्या 1 विद्यार्थी होत्या. दुबई निवासी सुजाता मालशे ज्या परदेशात संस्कृत भारतीच काम करतात. तसेच देववाणीच वर्ग व परीक्षा घेतात. त्यांच्या हस्ते पेणमधील प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये विविध कार्यक्रम सादर केले. दहा दिवसात छान अनुभव शिक्षण मिळाल्याच मत व स्वाती चक्रदेव यांचे कौतुक विद्यार्थी, पालक करत होते. समारोप प्रसंगी सुमारे 50 ते 60 संस्कृत प्रेमी उपस्थित होते. यावेळी डॉ.अशोक भोईर, विश्व हिंदु परीषद विभाग मंत्री उत्तम चक्रदेव, भार्गवी धर्माधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version