| वावोशी | वार्ताहर |
महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत महाराष्ट्राचा हा वैभवशाली इतिहास, संस्कृती जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन वावोशीचे माजी सरपंच राजू शहासने यांनी वावोशी येथे केले. यावेळी दीपा गुरव, पांडुरंग हातनोलकर, दीपा गुरव, राजू शहासने, रंजना कडू, भारती नाईक, रिया वालम, पुनम भउड, पांडुरंग हातनोलकर, मुरलीधर कडू , शिक्षिका सौ. घरत, मानसी केदारे, रेखा धारवे, पल्लवी मोरे आदी उपस्थित होते.