I नवी दिल्ली I वृत्तसंस्था I
राष्ट्रपतीपदासाठी सर्व विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.काँग्रेसनेही त्यांच्या नावाला सहमती दर्शविली असून,पक्षाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेऊ,असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी जाहीर केले आहे.सिन्हा हे सध्या तृणमुलचे नेते आहेत.शरद पवार,गोपाळ गांधी,फारुक अद्वुल्ला यांनी निवडणूक लढविण्यास यापूर्वीच नकार दर्शविला आहे.