महिला अत्याचार रोखा – चित्रलेखा पाटील

सांगोला | विशेष प्रतिनिधी |
संपूर्ण देशात व राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे.साकीनाका,डोंबिवली येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुसंस्कृत समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणार्‍या आहेत.देशाची राजधानी असणार्‍या दिल्लीत महिला सुरक्षित नाहीत.महिलांवरील अत्याचाराना पायबंद घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज असताना राज्य व केंद्र शासन मात्र महिलांवरील अत्याचार प्रकरणात राजकारण करत असून याचा निषेध करण्यात आला. तसेच महिला अत्याचार रोखण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी.असा ठराव महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी मांडला.

Exit mobile version