वाढीव वीज बिल रोखा; आपची मागणी

| पाली | वार्ताहर |

वाढते वीज बिल व डोंगराळ भागात होणारा विजेचा लपंडाव यासंदर्भात आम आदमी पार्टी सुधागड च्या वतीने बुधवारी पाली वीज महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी आपच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना योग्य माहिती व वस्तुस्थिती सांगितली. यावेळी आप रायगड जिल्हा संघटन मंत्री हरिश्‍चंद्र शिंदे, आप सुधागड तालुका अध्यक्ष अशोक रायकर, तालुका उपाध्यक्ष अल्ताफ पानसरे, तालुका सचिव इरफान शेख, युवा आघाडी अध्यक्ष फैसल महाडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वीज कायदा 2003 सेक्शन 56 वीज ग्राहक अटी व शर्ती क्रमांक 15 नुसार थकबाकी व वादग्रस्त बिल याकरिता वीज पुरवठा बंद करण्यासाठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे. परंतु या कायद्याचा पालन न करता काही कर्मचारी मनमानी कारभार म्हणून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांचे विजेचे कनेक्शन कट करतात. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास होतो. असे देखील निवेदनात नमूद केले आहे.

Exit mobile version