| मुंबई | प्रतिनिधी |
ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ बसली आहे. सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो सहा रुपयांची तर घरगुती गॅसच्या किमतीमध्ये चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत ही दरवाढ केली आहे. सीएनजीचे दर आठ ते 12 रुपयांनी वाढण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. वाढीव दरांनुसार मुंबईत प्रति किलो सीएनजीसाठी 86 रुपये मोजावे लागत आहेत. तर प्रति किलो पीएनजीसाठी 52.50 रुपये आकारले जात आहेत.