इंधन, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी कराव्यात

शेकापचे म्हसळा तहसीलदारांना निवेदन
म्हसळा । प्रतिनिधी ।
शासनाकडून घरगुती वापरांसाठी आवश्यक असणारे गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल, डिजेल ही नित्योपयोगी इंधने तथा अन्य जीवनावश्यक वस्तू यांच्या किंमती कमी करण्यात याव्यात, यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात 2020-2021 मध्ये उद्भवलेल्या नैसगिक हानी आणि त्याचे परिणाम यांचा आढावा देत जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या बिकट परिस्थितीचा आलेख मांडण्यात आला आहे. ग्रामीण भागातील माता-भगिनींना धुरापासून कायमची मुक्ती मिळावी, यासाठी ‘स्वच्छ इंधन-बेहतर जीवन’ अशी घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 01 मे 2016 पासून उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. परंतु, गॅस सिलिंडरची किंमत आता तब्बल 900 रुपयांवर पोहोचली असून, हा दरमहा खर्च ग्रामीण जनतेला परवडणारा नाही, असे या पत्रात म्हटले आहे. सोबतच शासनाच्या बदलत्या धोरणांचा उल्लेख करत त्यांचे सर्वसामान्यांवरील परिणामांचे वर्णन करण्यात आले आहे.

Exit mobile version