उष:काल फाऊंडेशनतर्फे कर्मचार्‍यांचा गौरव

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील वारक गावचे ग्रामस्थ नामदेव दामा शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उष:काल फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील आरोग्य, शिक्षण, लिंगभेद, स्त्री-पुरुष समानता या विषयाला हात देत काम करणार्‍या विविध क्षेत्रांतील 30 मान्यवरांचा 3 एप्रिल रोजी सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर, माणगाव येथे गौरव करण्यात आला.

उष:काल फाऊंडेशनचे संस्थापक नामदेव शिंदे यांच्या पत्नी उषा शिंदे या रायगड जिल्हा परिषद आरोग्य सेवेत परिचारिका म्हणून कार्यरत होत्या, तर त्यांचे भाऊ आदीप शिंदे हे कृषी विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते होते. यांच्या स्मरणार्थ शिंदे कुटुंबिय व हितचिंतक मित्रपरिवाराकडून सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्‍या सेवकांचा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघरचे अध्यक्ष संजय मंगला गोपाळ होते. यावेळी डॉ. विद्या दिवाण दापोली, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ते महेंद्र नाईक, आरती नाईक, समाजसेवक राजेश कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, बी.आर. नाईक उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘जेंडर डेंजर’ या महेंद्र नाईक लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थितांमध्ये माणगाव नगरपंचायत नगरसेविका ममता थोरे, अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना थोरे, माणगाव तालुका खरेदी विक्री संघ सभापती व माणगाव तालुका समन्वय समिती सदस्य शेकाप युवानेते निलेश थोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.

Exit mobile version