। मुंबई । प्रतिनिधी ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौर्यावर येणार आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईत येत आहे. मेट्रो 2- आणि मेट्रो 7 चं लोकार्पण त्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक सुरू केलं आहे.
त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौर्याला मोठे महत्त्व आहे.या दौर्यात ठाण्यात देखील पंतप्रधान जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष उपस्थित नाही राहिले तर ऑनलाईन तरी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.