नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौर्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी भारतात परतले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर भाजप कार्यकर्त्यांनी दिल्ली विमानतळावर पंतप्रधानांचे जंगी स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौर्यात सलग अनेक बैठका घेतल्या. पंतप्रधान मोदी हे जवळपास 65 तास अमेरिकेत होते आणि यादरम्यान त्यांनी 20 बैठकांमध्ये उपस्थिती लावली. तसंच अमेरिकेला जाताना आणि परतताना पंतप्रधान मोदींनी विमानतही अधिकार्यांसोबत 4 मोठ्या बैठका घेतल्या. अमेरिकेले जाताना दोन बैठका आणि तिथे पोहोचल्यानंतर तीन बैठका घेतल्या, अशी माहिती रविवारी सूत्रांनी दिली.