पंतप्रधान मोदींचे आवाहन

देशभरात 1500 ऑक्सिजन प्लांट उभारा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर देशातील निरनिराळ्या भागांमध्ये 1500 ऑक्सिजन प्लांट उभारा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिले. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाबाबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. देशभरात निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी अधिकार्‍यांना सूचित केले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. दुसर्‍या लाटेच्या दरम्यान अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. आता कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राने तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाबाबात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी देशातील निरनिराळ्या भागांमध्ये 1500 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लवकरात लवकर हे काम पुर्ण करण्यात यावेत, असेही त्यांनी अधिकार्‍यांना सांगितले.

याविशवाय प्लांटची देखरेख आणि त्याच्या कामाबाबत रुग्णालय कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यावर मोदींनी भर दिला. दरम्यान, या ऑक्सिजन प्लांटसाठी निधी पंतप्रधान निधीमधून दिला जाणार आहे. तसेच यामुळे देशात चार लाख ऑक्सिजन बेड उभारण्याास मदत मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशी काही लोक असली पाहिजेत, ज्यांना ऑक्सिजन प्लांटची देखभाल आणि कामकाजाबाबत प्रशिक्षण दिले जाईल. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी दुसर्‍या लाटेच्या दरम्यान हाहाकार माजवला होता. याशिवाय सध्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्राकडून खबरदारी घेतली जात आहे. दुसर्‍या लाटेदरम्यान मुंबई, बंगळुरु, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरर्सची कमतरता जाणवली होती.

Exit mobile version