पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल

। शिर्डी । वृत्तसंस्था ।

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरआले असून नुकतंच ते शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डीतील साई मंदिरात ते साईचरणी नतमस्तकही होतील. या सुमारास अर्धा तास हे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. साई मंदिरात पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाद्य पूजा करण्यात येईल. त्याचबरोबर ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही छोटेखानी आरतीसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.

Exit mobile version