पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डीत

| शिर्डी | प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरवारी एक दिवसाच्या महाराष्ट दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी हे दुपारी एक वाजता शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजा करणार आहेत. यानंतर अहमदनगरमध्ये सव्वा दोन वाजता निलवंडे धरणाचे जलपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.

इतकेच नाही, तर पंतप्रधान मोदी हे मंदिरातील नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन देखील करतील. आपल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी राज्यात सुमारे 7500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.

Exit mobile version