पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द

पुणे | वृत्तसंस्था |
देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान दि. 28 जानेवारी रोजी पुण्यात येणार होते. पंतप्रधान कार्यालयाकडून दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांचं उद्घाटन होणार होते. त्यामध्ये पुणे मेट्रो उद्घाटन, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाचे कलादालन, पुणे महापा पालिकेतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार होतं. मात्र, नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version