। चिपळूण । प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये गुरूंचे स्थान अनन्यसाधारण आहे. याच गुरु आणि गुरुकुल व्यवस्थेतील शिक्षण संस्थेप्रती विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंधाचे दर्शन घडवणारा क्षण मार्गताम्हाणे शिक्षण संस्था संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाच्या ज्ञान संकुलात संपन्न झाला. 1996 साली चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हणे येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची गरज लक्षात घेऊन स्थापन झालेल्या डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील कला शाखेतील शैक्षणिक वर्ष 2003 मध्ये शिकत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास कॅनन कंपनीचा प्रिंटर भेट दिला. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव, माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कला शाखेतील शैक्षणिक वर्ष 2003 शाखेतील माजी विद्यार्थी शशांक चव्हाण, सचिन शिर्के, मंगेश देवरुखकर, संतोष जंगम, वैभव वासावे, शितल घोले, नितीन सावंत, संध्या जाधव, दीपा शिर्के, तृप्ती घुले, टीव्ही-9 चॅनलचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर या माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयास कॅनॉन कंपनीचा प्रिंटर भेट दिला असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासामध्ये कृतज्ञतेची भावना म्हणून सतत पाठीशी राहण्याचा मनोदय सर्वांनी व्यक्त केला.







