स्वच्छतादूतांचा प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार

पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत प्रभाग क्र 18 मधील स्वच्छता दुतांचा सत्कार विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी स्वच्छता दुतांचे सन्मान करत कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल आभार व्यक्त केले.

आपला परिसर स्वछ व सुंदर ठेवण्यात स्वच्छता दुतांचा मोठा वाटा असतो. स्वच्छता दुत हे नेहमी आपले शहर, गाव, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. याच गोष्टीची जाणीव ठेवून पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी स्वच्छता दुतांचा सत्कार केला. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, डॉ.सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, ज्ञानेश्‍वर पाटील, शैलेश गायकवाड, स्वच्छता दूत यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version