सेवाश्री पुरस्काराने प्रीतम म्हात्रे सन्मानित

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सन्मान

| पनवेल | प्रतिनिधी |

इर्शाळवाडी दुर्घटनेत दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या पाठीमागे एक कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणाऱ्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून जे समाजकार्य संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ पनवेलच्यावतीने देण्यात येणारा सेवाश्री पुरस्कार त्यांना देण्यात आला. शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात हा सेवाश्री पुरस्कार रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटरच्या माध्यमातून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा आणि सेवाभावी संस्थांचा सेवाश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर तेथे जाऊन प्रितम म्हात्रे यांनी सर्वप्रथम दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरामधून युद्ध पातळीवर एन.डी.आर.एफ टीम, प्रशासन, पोलीस, सामाजिक संस्था तसेच स्थानिक नागरिक यांच्याकडून बचाव व मदत कार्य जे सुरु होते त्या ठिकाणी ते स्वतः जातीने उभे होते. त्यांनी मंदिराच्या माध्यमातून प्रशासनाला मदतकार्यात आवश्यक ती मदत त्यांनी केली. त्यांच्या या कार्याबद्दल प्रीतम म्हात्रे यांचा रोटरी क्लब पनवेल सेंट्रल तर्फे सेवाश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, संजीवनी गुणे, रोटरीचे अध्यक्ष रतन खरोल, सचिव अनिल खांडेकर, शेकाप पनवेल म.न.पा चिटणीस गणेश कडू, रोटरीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण पाटील, श्री. ठकेकर, संतोष घोडींदे आदी पदाधिकाऱ्यांसह रोटेरियन उपस्थित होते.

सेवाश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल मी संपूर्ण रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे आभार मानतो. हा पुरस्कार मी, माझ्या या कार्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना, संस्थेच्या स्वयंसेवकांना तसेच इतर सर्व संस्था ज्यांनी मदतीचा हात पुढे केला त्यांना समर्पित करतो.

प्रीतम म्हात्रे
Exit mobile version