। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे हे नेहमीच आपल्या डाऊन टू अर्थ वृत्तीमुळे जनमानसात घर करून असतात. प्रितम म्हात्रेंच्या साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा त्यांनी पनवेल महापालिकेतील सुरक्षा रक्षकांबरोबर उभ्या उभ्यानेच केलेल्या भोजनाप्रसंगी आला.
शुक्रवारी रात्री 12 वाजता पनवेल महानगरपालिकेत निवडून आलेल्या 73 सदस्यांची पहिल्या पंचवार्षिकमधील मुदत संपली. मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी दुपारी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आपल्या दालनातील सर्व साहित्य बाहेर काढून कार्यालयाचा निरोप घेतला. त्यानंतर प्रितम म्हात्रे यांनी पालिकेतील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचार्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रत्यक्ष आभार मानले. दरम्यान, तळमजल्यावर सुरक्षारक्षकांचे आभार मानण्यासाठी प्रितम म्हात्रे त्याठिकाणी गेले. त्यावेळी जेवणाची सुट्टी असल्यामुळे ते जेवत होते. त्यावेळी प्रितम म्हात्रे यांना पाहून सर्व कर्मचार्यांनी त्यांना नम्रपणे बसण्याची विनंती केली. तसेच सहजपणे जेवायला या असे प्रितम सांगताच क्षणाचाही विलंब न करता उभ्या उभ्यानेच प्रितम म्हात्रे यांनी सुरक्षा रक्षकांबरोबर जेवायला सुरुवात केली. त्यामुळे सारे सुरक्षा रक्षक भारावून गेले. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते पालिकेतील सुरक्षा रक्षकांबरोबर उभ्यानेच जेवत असल्याचे पाहून पालिकेत आलेल्या नागरिकांनी हा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला.