जय हनुमान गोवठणे विजेता
| उरण | वार्ताहर |
प्रितम स्पोर्ट्स कडापेच्या रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्ताने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन प्रीतम स्पोर्ट्स कडापेच्या वतीने उरण तालुक्यातील कडापे गावात करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन संतोष रघुनाथ थळी, अनिल गावंड, नागेंद्र म्हात्रे, अशोक म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत जय हनुमान गोवठणे विजेता तर तिरंगा स्पोर्ट्स आवरे हा संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्याचा सामनावीर गोवठणे संघाचा संकेत ठरला. स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार गोवठणे संघाचा स्वस्तिक देण्यात आला, उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर पुरस्कार तिरंगा स्पोर्ट्स संघाचा साहिल भोईर याला देण्यात आला.
या क्रिकेट स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून विनोद म्हात्रे, सत्यवान भगत, निराबाई सहदेव पाटील, संतोष पाटील, अमित म्हात्रे, निवास गावंड, आवरे धनेश गावंड, मिलिंद शामकांत गावंड, विनोद साळवी गट प्रमुख कॉटन ग्रीन शिवसेना उबाठा, सुनील म्हात्रे, मनोज गावंड, आवरे, संदीप गावंडे, मनोज पाटील, प्राची पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन जितेंद्र थळी यांनी केले. तर, समालोचन निवास गावंड, सूरज म्हात्रे व दौलत भोईर यांनी केले.
यावेळी विद्यार्थी गुणगौरव तसेच प्रितम स्पोर्ट्स कडापे संघाच्या माजी कर्णधार व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
