काँग्रेसशिवाय आघाडी अशक्यच पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

पुणे | प्रतिनिधी |
राजकारणात राजकीय महत्त्वकांक्षा ठेवणं गैर नाही. पण बेकीचं वातावरण करून विरोधकांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करू नये, असं सांगतानाच काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी होऊच शकत नाही. अशी आघाडी झाल्यास तिला यश मिळणार नाही, असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
सुवर्ण विजय द्विसप्ताह निमित्त शहर काँग्रेसच्याने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आम्ही काम केलं आहे. त्यांना त्यांचा विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना काही राजकीय महत्त्वकांक्षा असतील तर त्यातही काही गैर नाही. परंतु मोदींनी पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे. त्या एकजुटीत त्यांनी कुठेतरी बेकीच वातावरण निर्माण करु नये. ती एकजूट तोडण्याचा प्रयत्न करु नये, असं चव्हाण म्हणाले.

Exit mobile version