3000 मीटरमध्ये प्रथम क्रमांक
| उरण | वार्ताहर |
उरण तालुका शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा जेएनपीटी टाऊनशिप येथे पार पडल्या. या स्पर्धेत महत्त्वाची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे 3000 मीटर धावणे. यात वेग व स्टॅमिना असे दुहेरी कसब खेळाडूला पणाला लावावे लागतात. या स्पर्धेत रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरेमधील इयत्ता अकरावीमध्ये शिकत असलेल्या 16 वर्षीय पृथ्वीराज कडू याने वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या कामगिरीच्या जोरावर त्याची जिल्हास्तरावर नियुक्ती झाली आहे.
3000 मीटर स्पर्धेसाठी खेळाडूला मैदानावर तसेच डोंगर रांगा व समुद्राच्या वाळूवर सराव करावा लागतो. त्याचबरोबर काही व्यायाम प्रकारही करावे लागतात, तेव्हा वेग आणी स्टॅमिनाचा मेळ बसतो. त्यामुळे ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. पोलीस भरती व सैन्यदल भरतीसाठी म्हणूनच या धावण्याच्या प्रकाराची मैदानी परीक्षेसाठी समावेश आहे. या शालेय स्पर्धेत रामचंद्र म्हात्रे विद्यालयाच्या पृथ्वीराज कडू याने सात मिनिटे ही वेगवान वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचे नाव उज्वल केले.
या स्पर्धेतील अन्य मानकरी प्रणय पाटील 1500 मीटर तृतीय, कर्तव्य गावंड 1500 मीटर प्रथम, 400 मीटर द्वितीय. थाळीफेक द्वितीय, पियुष म्हात्रे 200 मीटर द्वितीय, निमेश म्हात्रे 400 मीटर तृतीय, आर्यन म्हात्रे, शुभम म्हात्रे भालाफेक अनुक्रमे द्वितीय व तृतीय. तसेच मुलींमध्ये सनई गावंड 1500 मीटर द्वितीय, श्रेया कोळी 400 मीटर धावणे प्रथम. लांब उडी द्वितीय, सांज पाटील 400 मीटर धावणे तृतीय, वेदांगी ठाकूर 200 व 100 मीटर धावणे द्वितीय. तर, मुलींचा रिले द्वितीय व मुलांचा रिले संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. यातील प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक प्राप्त खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली आहे.
क्रीडा शिक्षक जानकर सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या विजेत्या खेळाडूंचे विद्यालयाचे प्रा. सुभाष ठाकूर व विद्यालयाच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे आभिनंदन केले आहे.







