खासगी बसला भीषण आग

। मुंबई । प्रतिनिधी ।

मालाड पूर्वेकडील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका खासगी बसला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी (दि.20) सकाळी 9.30 ते 10 च्या सुमारास घडली.
ही बस मुंबईहून उज्जैनकडे जात असल्याची माहिती मिळत आहे. प्रवाशांनी भरलेल्या या बसने अचानक पेट घेतल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र चालक व वाहकाच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ केलेल्या कारवाईमुळे बसमधील सर्व प्रवाशांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, मेट्रो प्रशासन आणि 108 रुग्णवाहिका सेवेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. या आगीमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

Exit mobile version