प्राथमिक विभागाचा बक्षिस समारंभ

। तळे । वार्ताहर ।

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाल विकास मंदिर आणि प्राथमिक विद्यामंदिराच्या सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांमध्ये शैक्षणिक, क्रीडा व अन्य उपक्रमांचा बक्षीस समारंभ मंगळवारी (दि.20) संस्थेच्या सभागृहात पार पडला. यावेळी चित्रकला, निबंध, श्‍लोक पाठांतर, कविता पाठांतर, पाढे पाठांतर, क्रीडा स्पर्धा या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिके देण्यात आली. तसेच, शैक्षणिक वर्षात महामानवांच्या जयंती-पुण्यतिथी, पालक मेळावा, पालकांसाठी विविध खेळांचे आयोजन, मनोरंजनात्मक खेळ तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त उपक्रमांचे वर्षाभरात नियोजन केले जाते.

कार्यक्रमाला पुरुषोत्तम मुळे, मारुती शिर्के, किरण देशमुख, महादेव बैकर, दिलीप ठाकरे, प्रकाश गायकवाड, ऋता देशमुख, डॉ.विभावरी देशमुख, जयश्री वडके, शितल सप्रे, सुभाष मुंढे, विठ्ठल सुतार, विनायक महाडकर, किरण सातांबेकर, ज्योती पायगुडे, अमृता पांढरकामे, स्वप्नाली कदम, स्नेहल तळकर, चैताली तावडे, धनश्री कोलवणकर इत्यादी उपस्थित होते.

Exit mobile version