| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत मंगळवारी (दि.17) वार्षिक बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय सल्लागार गबाजी गीते, मुख्याध्यापिका रिना म्हात्रे यांच्यासह शाळेच्या विविध समित्यांचे सदस्य व पालक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रमुख पाहुणे गबाजी गीते यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. तसेच, पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते. त्यानंतर प्रमुख पाहुणे गबाजी गीते यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेच्या सहाय्यक शिक्षिका प्रतिमा पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.






