कर्जतमध्ये गृहमतदानाची प्रक्रिया सुरू

| कर्जत | प्रतिनिधी |

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने 85 वर्षे वयावरील मतदारांसह दिव्यांग मतदार तसेच अत्यावश्यक सेवेतील एकूण 311 मतदारांसाठी गृहमतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी या विधानसभा कार्यक्षेत्रात गृहमतदान प्रक्रिया सुरू झाली. कर्जत विधानसभा मतदारसंघात 85 वर्षे वयावरील 59 मतदार आणि 11 दिव्यांग मतदारांसह अत्यावश्यक सेवेतील 3 मतदार असे एकूण 73 मतदार गृह मतदानासाठी प्रक्रिया राबविली जात असून, कर्जत विधानसभा मतदार संघातील नगरपरिषद हद्दीतील जयराम शिवराम गांगल यांनी आज वयाच्या 101 व्या वर्षी गृह मतदान केले. त्यांनी आत्तापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांसाठी मतदान करून आपले कर्तव्य बजावले आहे.

Exit mobile version