नागोठण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नागोठणे | प्रतिनिधी |

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागोठणे शहरात शिवसेना शाखा नागोठणे यांच्या वतीने भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा जयंती सोहळा शुक्रवार दि.6 मार्च रोजी सोहळा मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष इमरान पानसरे यांनी दिली.

जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता किल्ले रायगड येथून नागोठण्याकडे शिवज्योतीचे आगमन छत्रपती शिवाजी महाराज चौकात होईल. सकाळी 10 वाजता शिवप्रतिमेचे पूजन व महाशिवआरती होणार आहे. दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नागोठणे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री 7.30 वाजता मिरवणुकीची सांगता व आभार प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरे शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर तसेच जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नागोठणे शहरात या जयंती सोहळ्याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version