नागोठण्यात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
। नागोठणे । वार्ताहर ।

उत्तर प्रदेश लखीमपुर खेरी येथे गाड्या अंगावर घालून बळीराजाला चिरडणार्‍या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे केंद्र सरकारचा सोमवारी (दि.11) सकाळी 11 वाजता जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी नागोठण्यातील सर्व व्यापार्‍यांनी नागोठणे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु ठेवण्यात आली होती.
निषेध असो निषेध असो केंद्र सरकारचा निषेध असो, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, शेतकर्‍यांना चिरडणार्‍या केंद्र सरकारचा निषेध असो अशा विविध घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची रॅली बाजारपेठ, खुमाचा नाका मार्गे नागोठणे पोलीस ठाण्यापर्यंत आल्यानंतर रॅलीची सांगता झाली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते दिलीप टके, विलास चौलकर, कृष्णा धामणे, वसंतराव महाजन, सुधाकर जवके, राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष संतोष कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, शहर सचिव रोहिदास हातनोलकर, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, विनय गोळे, सचिन कळसकर, युवक शहर अध्यक्ष कुणाल तेरडे, पप्पूशेठ अधिकारी, अलिमभाई मांडलेकर, निवास पवार, प्रकाश मोरे, दिनेश घाग, ऍड. श्रीकांत रावकर, सिद्धार्थ काळे, अमित जांबेकर, नितीन पत्की, बिपीन सोष्टे, शहर उपाध्यक्ष झिशान सय्यद, मनोज ताडकर, शाम पाटील, निलेश म्हात्रे आदींनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version