Sale!

Braid Kapashi kolhapuri Chappal- women

1799

Braid Kapashi kolhapuri Chappal- women

Description

◆कोल्हापुरी चप्पल –

1) कोल्हापुरी चप्पल हा भारतीय हस्तकलेच्या परंपरेतील महत्वाचा भाग आहे.

2) तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना कोल्हापुरी चप्पल वापरायला आवडते.

3) कोल्हापुरी चप्पल हे एक पारंपरिक आणि हाताने बनवलेले उत्पादन आहे.

4) मूलतः कोल्हापुरी चप्पल हे टॅन लेदरपासून बनवलेले असते. अस्सल कोल्हापुरी बनवण्यासाठी कमीत-कमी 13 तर जास्तीत-जास्त 28 दिवस लागतात.

5) यासाठी वापरली जाणारी सर्व सामग्री आणि प्रक्रिया नैसर्गिक असल्याने ते आरोग्यदारी आहे. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता शोषून घेऊन ती शरीराला थंडावा देते.

Kolhapuri Chappal

1) Kolhapuri Chappal is the icon of Indian Traditional art.

2) Everyone from young to old loves to wear it.

3) Kolhapuri Chappal is traditional and totally handmade product.

4) Basically it is made from tanned leather. It takes more than 28 days to make original Kolhapuri Chappal.

5) It is enough healthy due to natural material and authentic process. It consumes heat from body and gives cool feel in summer.

◆कोल्हापुरी चप्पलबाबत महत्त्वपूर्ण गोष्टी –
1) पूर्णपणे चामड्यापासून बनवलेल्या चपलेला 1000 वर्षांचा इतिहास आहे. या चप्पलची शिलाईसुद्धा चामड्यापासून केली जाते आणि हे चामडे पुर्णतः नैसर्गिक पद्धतीने कमावले जाते.

2) कोल्हापुरी चपलेची एक जोडी बनवण्यासाठी जास्तीत-जास्त 28 दिवस लागतात. अस्सल कोल्हापुरी चप्पल ही पूर्णपणे हातांनी बनवलेली असते; यासाठी मशीनचा वापर होत नाही. याच्या अप्पर बेल्टवर असणाऱ्या नाजूक वेण्यासुद्धा हातांनी विणलेल्या असतात.

3) कोल्हापुरी चप्पल ही आरोग्यदायी आणि ऑरगॅनिक जीवनशैलीसाठी ओळखली जाते कारण ती शरीरातील उष्णता शोषून घेते. शरीरातील उष्णता शोषून घेतल्यामुळे शरीराचे तापमान कमी होते आणि डोळ्यांना थंडावा मिळतो.

4) कोल्हापुरी चप्पलच्या तळव्यामध्ये ‘विंचू’ घातला जातो. त्यामुळे चालताना त्याचा करकर असा आवाज येतो. चप्पल बनवण्यासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य हे नैसर्गिक आणि विघटनक्षम असते. म्हणून ही चप्पल इकोफ्रेंडली आणि प्रदूषणमुक्त असते.

5) कोल्हापुरी चप्पल ही पारंपरिक तसेच पाश्चात्य पेहरावावरसुद्धा उठून दिसते आणि राजेशाही जीवनशैलीची अनुभूती देते.

◆Important Facts about Kolhapuri Chappal –

1) Kolhapuri Chappal has 1000 years of history. It is totally made up of leather. It’s also stitched with leather. Leather is processed by fully organic method.

2) A single Pair of Kolhapuri Chappal takes maximum 28 days to be ready. Original Kolhapuri is totally handmade, not Machin made. The fine braids on upper belt of Kolhapuri are totally woven by hands.

3) Kolhapuri Chappal is known for healthy and organic lifestyle because it absorbs body heat. By absorbing body heat, it decrease body temperature and keep our eyes cool.

4) ‘Vinchu’ is inserted into the sole of Kolhapuri. That’s why it sounds – Karr… Karrr…karrrr while walking. All the material for it is natural and decomposable. That’s why it is eco-friendly and pollution free.

5) Kolhapuri Chappal looks trendy with both traditional and western outfits. It gives experience of royal lifestyle.

पावसाळ्यात कोल्हापुरी चप्पलची काळजी कशी घ्याल?

पावसाळी हवामानात असलेल्या आर्द्रतेमुळे कोल्हापुरी चप्पलला बुरशी लागण्याची शक्यता असते. कारण ती चामड्यापासून बनलेली असते.

पाणी आणि आर्द्रता यांचा कोल्हापुरी चप्पल सोबत संपर्क टाळणे आवश्यक असते. त्यामुळे पावसाळ्यात कोल्हापुरी चप्पल दररोज वापरली जाऊ शकत नाही.

म्हणूनच पावसाळ्यात कोल्हापुरी चप्पलची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी महत्वाच्या काही टिप्स-

1) पावसाळा सुरू होताना कोल्हापुरी चप्पल एकदा कडक उन्हात काही वेळ वाळवून घ्या.

2) त्यांनतर स्वच्छ कोरड्या कापडाने ती पुसून घ्या.

3) त्यांनतर ती कागद अथवा प्लास्टिकमध्ये गुंडाळा आणि हवेचा कमीत-कमी संपर्क येईल अशाप्रकारे ठेवा.

4) अधूनमधून तुमची कोल्हापुरी काढून ती स्वच्छ पुसून परत पॅक करून ठेवायला विसरू नका.

5) पावसाळा संपला की लगेच तुमची कोल्हापुरी बाहेर काढा. स्वच्छ पुसून घेऊन शक्य असेल तर थोडा वेळ उन्हात ठेवा.

6) आवश्यकता असेल तर तिला तेल द्या किंवा मग पाहिजे असेल तर तुमच्या आवडत्या रंगात पॉलिश करा.

आणि मग तुमच्या आवडत्या कोल्हापुरी सोबत तुमचा प्रवास पुन्हा चालू करा. पण चालताना मात्र एकदम तोऱ्यात आणि रुबाबात चालायचं बरं का!

◆How to take care of Kolhapuri Chappals in rainy season?

Due to the humidity in rainy weather, Kolhapuri Chappals are prone to fungus. Because it is made of leather.

It is important to avoid contact of water and moisture with Kolhapuri Chappal. Therefore, Kolhapuri slippers cannot be used daily in rainy season.

That is why it is necessary to take special care of Kolhapuri Chappals in rainy season. Here are some important tips-

1) Once the rains begin, dry the Kolhapuri slippers once in the scorching sun.

2) Then wipe it with a clean dry cloth.

3) Then wrap it in paper or plastic and keep it in such a way that there is minimal contact with air.

4) Don’t forget to remove your Kolhapuri from time to time, wipe it clean and pack it back.

5) Take out your Kolhapuri as soon as the rains end. Wipe clean and keep in the sun for a while if possible.

6) Oil it if needed or polish it with your favorite color if desired.

And then restart your journey with your favorite Kolhapuri. But while walking, Don’t forget to walk with royal grace!

Additional information

Weight 0.5 kg
Dimensions 33 × 15 × 16 cm
Color

Natural, Orange, black, Brown

Size

10, 11, 7, 8, 9