| चिरनेर | प्रतिनिधी |
कडापे येथील मारुती नाग्या म्हात्रे (66) यांचे रविवारी (दि. 25) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. प्रा. प्रशांत म्हात्रे यांचे ते पिताश्री होते. त्यांच्या अंत्ययात्रेला विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. एकेकाळी समुद्रात बुडी मारून रेती काढून, आपल्या कुटुंबाची उपजीविका चालविणार्या मारुती म्हात्रे यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण व संस्कार दिले. त्यांचा एक मुलगा प्रशांत म्हात्रे हा प्राध्यापक आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार, दि. 3 सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र वशेणी खाडी येथे सकाळी आठ वाजता, तर उत्तरकार्य विधी गुरुवार, दि. 5 सप्टेंबर रोजी कडापे येथील राहत्या घरी होणार आहेत.