प्रा. साईबाबाची निर्दोष सुटका

| मुंबई | प्रतिनिधी |

नक्षली चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या दिल्ली विद्यापीठातील माजी प्रा. जी.एन. साईबाबा याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे. नक्षली चळवळीशी संबंध असल्याचा आरोपातून त्याची निर्दोष सुटका केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याप्रकरणी जीएन साईबाबांसह अन्य पाच आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. न्या. विनय जोशी आणि न्या. वाल्मिकी यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे.

जीएन साईबाबा आणि अन्य आरोपींना 2014 साली नक्षली चळवळीशी संबंध आणि हिंदुस्थानविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यात जीएन साईबाबा, हेम मिश्रा, महेश तिर्की, विजय तिर्की, नारायण सांगलीकर, प्रशांत राही आणि पांडू नरोटे (त्यांचा मृत्यू झाला आहे) यांचा समावेश आहे. दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने साईबाबांच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी केली. कारण, उच्च न्यायालयाचा यापूर्वीचा दोषमुक्तीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता.

Exit mobile version