रोटरी क्लबतर्फे व्यावसायीक पुरस्कार

| पनवेल | प्रतिनिधी |

रोटरी क्लब ॲाफ पनवेल सिंफनीच्या वतीने व्यावसायीक उत्कृष्ठता पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोटरी कम्यूनिटी सेंटर येथे संपन्न झालेल्या एका सोहळ्यात हानीफ कच्छी व पुष्पलता देशपांडे याना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी वसंत मालुंजकर व माजी नगरसेवक गणेश कडू प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

हानिफ कच्छी हे आपला पारंपारीक बैलगाडीचे चाकजोड बनविण्याचा व्यवसाय करतात. 300 वर्षां पासून कच्छी कुटूंब या व्यवसायात कार्यरत आहे. बंदरात येणाऱ्या जहाजांतील माल वाहून नेणाऱ्या बैलगाड्यांना त्यामुळे मोठी मदत झाली आहे. सध्या हानिफ हे एकमेव हा व्यवसाय निष्ठेने करत असून त्यांना पनवेलभूषण हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. श्री जगन्नाथाच्या रथाची चाके बनवण्याचा बहूमानही त्यांना मिळाला आहे. या कार्याबद्दल प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version