मुंबईत रंगणार व्यावसायिक कबड्डी स्पर्धा

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईतील प्रभादेवी येथील स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्यावतीने राजाभाऊ देसाई स्मृती चषक या व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धेला पाच मार्चपासून सुरुवात होत असून आठ मार्चला या स्पर्धेच्या अजिंक्यपदाचा फैसला होणार आहे. या स्पर्धेमध्ये 14 अव्वल दर्जाच्या व्यावसायिक संघांचा समावेश असणार आहे.

यंदाही विशेष व्यावसायिक स्पर्धेत गतविजेता भारत पेट्रोलियम, इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन), युनियन बँक, मुंबई महानगर पालिका, बँक ऑफ बडोदा, महिंद्रा आणि महिंद्रा, रिझर्व्ह बँक, मिडलाईन अकादमी, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा बलाढ्य संघांचा ‘दमदार’ खेळ चवन्नी गल्लीत उभारलेल्या सीताराम चव्हाण क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर अनुभवता येईल. स्पर्धेत एकंदर 14 बलाढ्य संघ खेळणार असून तीन-तीन संघांचे दोन, तर चार-चार संघांचे दोन-दोन गट खेळविले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी एकमेकांशी भिडतील.

सहभागी संघ: मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीटी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल), रिझर्व्ह बँक (आरबीआय), मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम), अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्युसर मार्केट कमिटी (एपीएमसी), युनियन बँक (युबीआय), आयएसपीएल (युवा पलटण), मिडलाईन अकादमी, संत सोपान सहकारी बँक, न्यू इंडिया अ‍ॅश्युरंस, जे. एस. डब्ल्यू, महिंद्रा आणि महिंद्रा, बँक ऑफ बडोदा, ठाणे महापालिका.
Exit mobile version