कारच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू

| विरार | वृत्तसंस्था |

विरार हिट अँड रन एका कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आत्मजा कासट (46)असे प्राध्यापिकेचे नाव असून त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे.

विरारमध्ये कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू गुरुवारी (दि.1) संध्याकाळच्या सुमारास आत्मजा या विरार पश्चिम येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन जात असताना त्यावेळी पाठीमागून आलेल्या टोयोटा फॉर्च्युनर कारने त्यांना धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. कारचालकाने त्यांना नजिकच्या रुग्णालयात नेले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अर्नाळा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, शुभम पाटील याला अटक केली आहे.

Exit mobile version