| पाली | प्रतिनिधी |
पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानच्या माघी गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. रविवारी 22 ते 26 जानेवारीपर्यंत साजरा होत आहे. यानिमित्ताने देवस्थानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यानी दिली.
रविवारी (दि.22) या उत्सवाचा प्रारंभ काकडआरती, पुण्याहवाचन, अभिषेक आदी धार्मिक विधीनी करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी प्रवचन तर रात्री सुश्राव्य कीर्तन सादर करण्यात आले.
सोमवारी (दि.23) पहाटे काकड आरती, अभिषेक होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 ते 6 मृणाल भिडे यांचे गायन तर रात्री सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
मंगळवारी (दि.24) पहाटे काकड आरती, अभिषेक. दुपारी सिद्धकला महिला भजनी मंडळाचे भजन होणार आहे. महिलांसाठी हळदीकुंकू, मंत्रजागर आणि रात्री कीर्तन होणार आहे.
बुधवारी (दि.25) पहाटे काकड आरती, तुकाराम दैठणकर(पुणे) यांचे सनईवादन, अभिषेक आणि श्रींचा जन्मोत्सव कीर्तन होणार आहे. सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा, महानैवेद्य.
गुरुवारी (दि.26) सकाळी 11 ते 2 महाप्रसाद, रात्री लळीतानिमित्त दुरितांचे तिमिर जावो हे नाटक, उत्तररात्री लळीत (शुक्रवारी पहाटे) असे कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण सोहळ्यात चारुदत्त आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे , उपसरपंच वैभव आपटे, विश्वस्त प्रमोद पावगी, विश्वास गद्रे, अरुण गद्रे, अमोल साठे, डॉ.पिनाकिन कुंटे यांनी दिली.