मुलींच्या आरोग्या संदर्भात कार्यक्रम

। खांब । वार्ताहर ।

मुलींच्या सदृढ आरोग्यासाठी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजने एक पाऊल पुढे टाकत मुलींच्या आरोग्या संदर्भात विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला. कंपनीच्या सी.एस.आर विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या विशेष संकल्पनेतून तसेच इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्युज या संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी ‘मासिक पाळी दरम्यान आरोग्य, स्वच्छता आणि मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या सी.एस.आर विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा आणि महाड तालुक्यातील एकुण 11 हायस्कूल व महाविद्यालयातील 8 वी ते 12 वीच्या एकूण 500 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होतो.

Exit mobile version