| कोल्हापूर | प्रतिनिधी |
जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या कालावधीत गणेशमूर्ती आगमन, घरगुती गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक तसेच इतर कार्यक्रमादरम्यान लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने डोळ्याचा पडदा तसेच बुबळाला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून आयोजित मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा शो किंवा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163/1अन्यये 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईट वापरास प्रतिबंध केला आहे. तसेच, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.







