वेश्वीमध्ये प्रोजेक्ट दृष्टी उपक्रम

चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप

| अलिबाग | प्रतिनिधी |

समाजात वावरत असताना आपले समाजाप्रती काहीतरी देणे लागते या भावनेतून शेतकरी कामगार पक्षाने सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य पार पाडत आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असून, नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग तालुक्यातील वेश्वी या ठिकाणी मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच चष्मे वाटपाचा कार्यक्रम प्रोजेक्ट दृष्टी या उपक्रमातून घेण्यात आला. सोमवारी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने राबविलेल्या या उपक्रमातून आजपर्यंत 20 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तरुणींचा सहभाग आहे.


ओमकार क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने वेश्वी येथे प्रोजेक्ट दृष्टी उपक्रम सोमवारी (दि.02) रोजी घेण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, विद्यमान उपसरपंच आरती पाटील, गिरीश शेळके, अंकीत शेळके, विरेंद्र मगर, पंकज गुरव, अतिष पाटील, निकेश शेळके, ओमकार नलावडे, अनंत मुळूस्कर, जुई शेळके, रुपाली गुरव, विष्णू मगर, राघव गुरव, सदानंद शेळके, सुशांत नलावडे, केदार नलावडे, किरण गुरव, प्रसाद मगर, अंकीत मिंद, वैभव गोळे, प्रतिक गुरव, जितेंद्र गुरव, गौरव राऊळ, रोहन राऊळ, जिल्हा रुग्णालयातील टेक्निशिअन नंदू म्हात्रे, साहील म्हात्रे, मदतनीस रुपेश पाटील, तसेच लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे सर्व कर्मचारी, वेश्वीचे ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.

वेश्वीत 268 जणांना मोफत चष्मे
वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील यांच्या पुढाकाराने साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये वेश्वीतील ग्रामस्थ, महिला, तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नेत्रतपासणीसाठी लाभार्थ्यांची रांग दिसूून आली. शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नातून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. 268 जणांना मोफत चष्मे वाटप केले.
रक्तदात्यांनी जपली बांधिलकी
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील ओमकार क्रिडा मंडळाच्यावतीने सोमवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन वेश्वीच्या उपसरपंच आरती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, राकेश राऊळ, अंकित शेळके, नितेश शेळके, सौरभ शेळके, स्वप्नील शेळके, केदार नलावडे, जिल्हा रुग्णालयातील रक्त्त संक्रमण अधिकारी डॉ. दिपक गोसावी, प्रशांत तुरूरे, मंगेश पिंगळा, परिचारिका, आदींसह मंडळाचे पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान हेच श्रेष्ठदानही भावना मनात ठेवत असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून बांधिलकी जपण्याचे काम केले. 25पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले.
Exit mobile version