प्राईड इंडिया मार्फत प्रोजेक्टर वितरण कार्यक्रम

। महाड । वार्ताहर ।
जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल अवान्से प्राईड इंडिया यांच्या मार्फत प्रोजेक्टर वितरण संपन्न झाले. राजिप शाळा मोहोत, शाळा भावे, शाळा गोंडाळे यांना सदर प्रोजेक्ट वितरण केले. या प्रोजेक्ट वितरण कार्यक्रमाला प्राईड इंडियाचे मॅनेजर डॉ.विरेंद्र कुलकर्णी, आईडल व्हिलेजचे प्रभाकर गोरूले, मोहोत शाळेचे केंद्र प्रमुख हेमलता देशमुख, प्राईड इंडिया संस्थेच्या शिक्षिका रेश्मा डावले भावे शाखेचे मुख्याध्यापक चिनके, गोंडाळे शाळेचे मुख्याध्यापक वाडीकर, सर्व सहाय्यक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बदक यांनी तर प्रास्ताविक अवान्से मॉडेल स्कूलच्या समन्वयक प्रा.सुप्रिया शिवशिवकर यांनी केले. दृकश्राव्य साधन म्हणून शिक्षणामध्ये प्रोजेक्टरचे महत्व स्पष्ट केले.

Exit mobile version