। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील लोकसंख्येनी मोठी असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. ग्रामपंचायत विसर्जित झाल्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय राजवट बसली आहे. यानंतर काही सकारात्मक बदल झाले असल्याचे दिसून येत आहेत. प्रशासक सुजित धनगर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार नेरळ बाजारपेठेतील कचरा आता रात्रीच उचलला जाऊ लागला आहे. दरम्यान, पाणी पुरवठा सुरळीत करणे आणि कचर्याची योग्य विल्हेवाट लावणे हि प्रमुख उध्दीष्टे नेरळ ग्रामपंचायतीकडून ठेवण्यात आली आहेत.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत नागरीकरण वेगाने होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या अडचणी आणि समस्यांवर मार्ग निघत नव्हता. यामुळे ग्रामसभेत समस्यांचा पाऊस पडायचा. नेरळ ग्रामपंचायत विसर्जित झाल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये शासनाच्या माध्यमातून प्रशासक पाठवण्यात आला आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातील उपअभियंता या पदावरील सुजित धनगर यांनी प्रशासक म्हणून कामकाज सुरु केल्यानांतर नेरळ ग्रामस्थ काही प्रमाणात आश्वस्त झाले आहेत.प्रशासक यांनी ग्रामपंचायती मधील सर्व कर्मचारी यांनी विश्वासात घेत प्रसंगी पहाटे सहा वाजण्यापूर्वी तर कधी रात्री अकरा पर्यन्त फिल्डवर उभे राहून कर्मचार्यांना दिलासा देण्याचं अप्रयत्न केला आहे. तसेच, नेरळ गावातील बाजारपेठेतील कचरा संकलन आता रात्रीच होऊ लागले आहे. रात्री आठपासून अकरा वाजेपर्यंत मुख्य बाजारपेठ, जुनी बाजारपेठ तसेच खांडा पर्यंत आणि अन्य रस्त्यांवरील सर्व दुकानदार यांना कचरा हा घंटा गाडीत टाकण्यात यावा, अशी सूचना केली आहे.