| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
कोरोना व खड्ड्यांच्या अडथळ्यांवर मात करीत विघ्नहर्ता श्रीगणेशाचे 31 ऑगस्ट रोजी म्हणजे गणेश चतुर्थीला धूमधडाक्यात आगमन झाले. दीड दिवस भक्तांच्या घरी विराजमान झालेल्या गणराला गुरुवारी ढोल-ताशांच्या गजरात मुरुड समुद्रकिनारी निरोप देण्यात आला. यावेळी मुरुड समुद्रकिनारी नगरपरिषदेच्या वतीने विसर्जनस्थळी निर्माल्य कलश, समुद्र, खाडीच्या ठिकाणी विसर्जन करताना कोणीही समुद्रात बुडू नये यासाठी जीवरक्षक, मोटार बोट, नियंत्रण कक्ष, वैद्यकीय मदत, विद्युत व्यवस्था करण्यात आली होती. ती व्यवस्था पाहण्याकरिता नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे, राकेश पाटील, सतीश जंजिरकर, अभिजीत चांदोरकर, अभिजीत कारभारी, निलेश शेडगे, रुपये भाटकर, रुपेश पाटील, मितेश माळी, अविनाश अवघडे, नयन शिदे, विनय तळेकर यावेळी उपस्थित होते.