दोघांविरोधात गुन्हा दाखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील सृष्टी सारंग सोसायटीमधील व्यावसायिक गाळे ईडीने जप्त केले होते. परंतु, या विभागाची परवानगी न घेता गाळ्यांचे कुलूप तोडून मालमत्ता भाड्याने वापरण्यास दिली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे मुंबईमधील ईडीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या माहितीनुसार, सोसायटीमधील चार, सहा, सात, आठ व नऊ हे पाच गाळे ईडीने जप्त केले होते. या गाळ्यांना कुलूप लावले होते. त्यांची परवानगी न घेता कुलूप तोडून मालत्तेवर अतिक्रमण केले. गाळा क्रमांक चारमध्ये रिअल इस्टेट एजंट कार्यालय उघडण्यात आले. त्यानंतर गाळा नंबर सहा ते नऊ डिफेन्स ॲकेडमीसाठी भाड्याने देण्यात आल्याचा ठपका ठेवत माजी उपजिल्हाधिकारी नितेश ठाकूर यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







