| पनवेल | प्रतिनिधी |
बेलवली येथे घरफोडी करत 15 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पाच हजार रुपये चोरल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राघो पांडुरंग पाटील हे बेलवली येथे राहत असून मुलाच्या घरी नांदिवली, कल्याण येथे गेले होते. घरी परतले असता कडी-कोंयडा तुटलेला दिसला. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. यावेळी कपाटातील मंगळसूत्र आणि रोख रक्कम गायब असल्याने त्यांनी पोलिस तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
घरफोडीत ऐवज चोरीला
