। पनवेल । प्रतिनिधी ।
नवीन पनवेल, सेक्टर-12 येथील एका बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 8 लाख 11 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद कोरडे हे निवांत बंगला, सेक्टर 12, नवीन पनवेल येथे राहतात. त्यांच्या नातीचे लग्न असल्याने ते घर बंद करून चेंबूर (मुंबई) येथे लग्नाला गेले होते. याचा फायदा घेत चोरांनी त्यांच्या घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम असा 8 लाख 11 हजारांचा ऐवज चोरून नेला. प्रमोद कोरडे हे घरी परतले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला असता त्यांनी याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.






