| पनवेल | वार्ताहर |
खारघर येथील एका घरात घरफोडी करत अज्ञात चोरट्याने तेथून सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. प्रीतीलता हिरे या बेलपाडा, खारघर येथे राहतात असून, त्या कामाला गेल्या होत्या. तेथून त्या सायंकाळी घरी परतल्या असता त्यांना दाराचे कुलुप तोडण्यात आल्याचे आढळले. त्यावर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, चोरट्याने त्यांच्या घरातून 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरून नेल्याचे त्यांना दिसून आले. या बाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







