रोपवाटिका उभारणी योजनेसाठी प्रस्ताव

| अलिबाग | वार्ताहर |
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार किड व रोगमुक्त रोपे तयार करणार्‍या लहान रोपवाटिका उभारण्यास असलेला वाव पाहता या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात सन 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये 15 तालुक्यांमध्ये एकूण 17 शेतकर्‍यांच्या भाजीपाला रोपवाटिकेची उभारणी झाली आहे. त्यापैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 15 व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2 रोपवाटिका उभारण्यात आल्या आहेत. हवामान बदलाचा विचार करता भविष्यात तयार रोपे, कलमे यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर इच्छुक व पात्र शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे. योजनेकरिता रु.4.60 लाख खर्च मर्यादा असून त्यासाठी 50 टक्के अनुदान रक्कम रु.2.30 लाख अनुदान लाभार्थ्यास दिली जाणार आहे. तरी इच्छुक व पात्र शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.

Exit mobile version