हक्कभंगावरुन दोन्ही सभागृहांमध्ये प्रस्ताव सादर

राऊतांवरून राडा
| मुंबई | प्रतिनिधी |
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करणार असून पुढील बुधवारी (8 मार्च) हक्कभंग प्रकरणावर निर्णय देणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सांगितलं आहे. तसेच, गोंधळामुळे सभागृहाची बैठक दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा चोर मंडळ असा उल्लेख केला. राऊतांच्या याच वक्तव्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दिवस गाजला. राऊतांविरोधात सत्ताधारी शिवसेना गट आणि भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

तसेच, राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही भाजप नेते भातखळकर यांनी केली. यावरुन विधीमंडळात गदारोळ झाला. यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं मत वाचून दाखवलं. तसेच, दोन दिवसांत यासंदर्भात चौकशी करुन पुढील निर्णय बुधवारी जाहीर करु असं राहुल नार्वेकर यांनी निवेदनातून सांगितलं. त्यासोबतच निर्णय वाचून दाखवताना सभागृहाचा अवमान झाल्याची टिप्पणीही राहुल नार्वेकर यांनी केली. राहुल यांनी राऊतांविरोधातील हक्कभंगाच्या प्रस्तावावर निर्णय दिल्यानंतरही सभागृहात गदारोळ सुरुच होता. सत्ताधारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यासाठी सत्ताधारी आग्रही दिसत आहेत.

तर मी तुरुंगात जाईन -राऊत
सर्वोच्च सभागृहाचा मी सदस्य आहे. विधिमंडळ असो वा संसद या दोन्ही सभागृहाचा मी आदर केला आहे. राज्यसभेच्या कामकाजात सर्वाधिक सहभागी होणारा मी सदस्य आहे. संसदीय लोकशाहीवर मी कायम विश्‍वास ठेवला आहे. मुळात माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मी काय म्हणालो आणि कोणत्या संदर्भात म्हणालो हे समजून न घेता एकांगीपद्धतीने कारवाई होत असेल तर ते लोकशाहीला आणि लोकशाही परंपरेला धरून नाही असं त्यांनी म्हटलं. तसेच, चोरांवर संस्कार नसतात. त्यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही. माझ्यावर हक्कभंग आणला असेल तर मी समितीसमोर जाईन. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो. मी चोर्‍यामार्‍या केल्या नाहीत.असेही त्यानी निक्षूण सांगितले.

नितेश राणेंची धमकी
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळासंतप्तच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राऊत यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका केली. तसेच भर अधिवेशनात संजय राऊतांचं 10 मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाही, असं वक्तव्य केलं. आपल्याला रोज सकाळी संजय राऊतांचं ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांचं काय घेऊन खाल्लं आहे. राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे. ते सामनात येण्याआधी त्यांचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. तेव्हा त्यांची एवढी झालेली की, बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहिलं. शिवसेनेच्या विरोधात लिहीत होते असेही तेम म्हणाले.

Exit mobile version