सरपंचांमुळे ‘सुकन्या’ला समृद्धी; निखिल मयेकरांचा पुढाकार

नागाव परिसरात उघडणार खाती
| सारळ | वार्ताहर |
भारतीय डाक विभागाच्या सुकन्या समृद्धी योजनेवर भरोसा वाढत असून, जिल्हाभरातून मोठ्या संख्येने आई-बाबांनी आपल्या लेकीच्या सुंदर भविष्यासाठी या योजनेते गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. दरम्यान, नागाव परिसरातील 0 10 वर्षांपर्यंतची एकही बालिका या योजनेपासून वंचित राहू नये, म्हणून नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल मयेकर यांनी पुढाकार घेतला आहे. एकाच दिवसात जवळपास 95 मुलींची खाती उघडत मुलींचे भविष्य उज्ज्वल केले आहे.

दानात सर्वोत्तम दान कन्यादान म्हटले जाते. पण, मुलीच्या भविष्याबाबत जागृती असणार्‍या पालकांबाबत विचार केल्यास तळागाळातील समाजातच नव्हे, तर याबाबत फारशी माहिती नसते. त्या समाजाचे दायित्व स्वीकारत सरपंच निखिल मयेकर यांनी ग्रामपंचायत विभागातील पाल्हे, बागमळा, नागाव, मांडवे तर्फे बामणगाव, डावळे या सर्वच गावांतील 0 ते 10 वयाच्या बलिकांची सुकन्या समृद्धी खाती उघडण्यासाठी सुरुवातीची रक्कम स्वतः भरून मुलींच्या उज्ज्वल भविषाचा पाया भक्कम करण्याचे काम केले आहे. एकाच दिवसात त्यांनी विभागातील 95 खाती उधडली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सर्व परिसरातून शुभेच्छचा वर्षाव होत आहे.

याबद्दल डाक विभागाने आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे कौतुक करताना डाक अधीक्षक डॉ. संजय लिये यांनी नागाव सरपंच निखिल मयेकर यांच्या सकारात्मक विचारप्रणालीमुळे नागाव ग्रामपंचायात आता संपूर्ण सुकन्या समृद्धी ग्राम ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाईल. येथील प्रत्येक अभिमान वाटेल आपण या ग्रामपंचायत हद्दीत जन्म घेतला आहे याचा, असे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास ग्राम विकास अधिकारी श्‍वेता कदम, उपसरपंच रसिका प्रधान, सदस्य श्रीमती राणे, सहाय्यक अधीक्षक सुनील पवार, नीलिमा पाटील, नागाव प्रभारी पोस्टमास्तर किशोर वर्तक, मनोज अंबुरे, सोमनाथ आकरीक, नागेश साखरकर, ज्ञानेश राजे आदी मान्यवर उपस्थित त्यावेळी नागाव येथे घरोघरी फिरून सुकन्या समृद्धी खाती गोळा केलेल्या संजना म्हात्रे, निलेश पाटील, राजेश नाईक, सोनिया पेढवी, मनीषा घरत, नंदू राणे, संजय राणे, मनोहर पाटील, मयूर भोईर, किशोर वर्तक, संतोष चिपळूणकर यांचा सत्कार करण्यात आला.

नागाव सरपंच निखिल मयेकर यांच्या सकारात्मक विचारप्रणालीमुळे नागाव ग्रामपंचायत आता संपूर्ण सुकन्या ग्रामग्रामपंचायत म्हणून ओळखली जाईल. प्रत्येक लेकीला अभिमान वाटेल आपण या ग्रामपंचायत हद्दीत जन्म घेतला आहे याचा. – डॉ. संजय लिये, जिल्हा डाक अधीक्षक

Exit mobile version